Maharashtra Government Logo

निपुण भारत

इयत्ता - २ री

शब्द वाचन
सरबतसर्-बत्
हसऱ्याह-स-र्या
मित्रमि-त्र
ट्रॅक्टरट्रॅक्-टर्
गप्पाग-प्पा
मैत्रिणीमै-त्रि-णी
क्रिकेटक्रि-के-ट
आकाशआ-काश
जंगलजं-गल
निरोपनि-रोप
उद्यानउ-द्यान
आभाळआ-भाळ
स्वच्छस्व-च्छ
अरण्यअ-र-ण्य
अभ्यासअ-भ्यास
पुस्तकपु-स्तक
पोशाखपो-शाख
शेतकरीशे-त-क-री
प्रकाशप्र-काश
पाऊसपा-ऊस
फुलपाखरूफुल-पा-ख-रू
चिमणीचि-म-णी
कविताक-वि-ता
शाळाशा-ळा
विद्यार्थीवि-द्यार्-थी
बाजारबा-जार
पाणीपा-णी
खेळणीखे-ळ-णी
आईआ-ई
बाबाबा-बा
दादादा-दा
ताईता-ई
आजीआ-जी
आजोबाआ-जो-बा
भाजीभा-जी
वाक्य वाचन
१. हा आंबा मोठा, पिवळसर व रसाळ आहे.
२. आज समीरचा वाढदिवस आहे. त्याने मित्रांना मिठाई दिली.
३. सुजाता म्हणाली, "मी आज खेळायला येणार नाही."
४. ओकार, राजू तुझा भाऊ आहे. त्याला त्रास देऊ नकोस.
५. शबाना फातिमाला म्हणाली, "तू आणि मी बागेत जाऊ."
६. आज पाऊस पडत आहे. मुले घरात खेळत आहेत.
७. फुलपाखरू रंगीबेरंगी पंख फडफडवत फुलावर बसले.
८. चिमणी दाणे टिपत आहे. तिचे पिल्लू तिच्याकडे पाहत आहे.
९. मुले शाळेत कविता म्हणत आहेत.
१०. विद्यार्थी अभ्यास करत आहेत. ते पुस्तके वाचत आहेत.
११. आई बाजारातून भाजी आणते.
१२. माझी ताई मला खेळणी आणून देते.
१३. आजी-आजोबा गोष्टी सांगतात.
१४. दादा शाळेत जातो.
१५. बाबा कामावर जातात.
उतारा वाचन
आमचे घर
पाडयावरील घरे छोटी छोटी आहेत. घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी शाकारतात. घरातील जमीन, अंगण शेणाने सारवतात. भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात. ती वारली चित्रकलेतील असतात. घरे आतबाहेर स्वच्छ असतात. घरातील भांडीकुंडी स्वच्छ असतात. परिसरात कोठेही कचरा नसतो. घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो. कोंबड्यासाठी खुराडे असते. घरोघरी कुत्रा पाळला जातो.
माझी नात सोनाली
माझी नात सोनाली. हसऱ्या चेहऱ्याची, सर्वांना आवडणारी. आम्ही सर्वजण तिला लाडाने सोनू म्हणतो. सोनूला खूप मित्र-मैत्रिणी आहेत. सोनूला लगेच्या खेळायला आवडते. मैत्रिणींसोबत ती क्रिकेटसुद्धा खेळते. शनिवारी सोनू शाळेतून घरी आली. मला म्हणाली, "आजी गं, मी खेळायला जाते. मैत्रिणी माझ्यासाठी थांबल्या आहेत." मी म्हणाले, "तू लवकर परत ये." सोनू म्हणाली, "हो आजी, मी येते परत लवकर."